ट्रेलरच्या धडकेत स्कुटीस्वार ठार

By Admin | Updated: August 24, 2016 00:34 IST2016-08-24T00:34:35+5:302016-08-24T00:34:35+5:30

हैद्राबादकडून येणा-या ट्रेलरच्या खाली स्कुटीस्वार ठार झाल्याची घटना.

ScrubShawar killed in a trailer crash | ट्रेलरच्या धडकेत स्कुटीस्वार ठार

ट्रेलरच्या धडकेत स्कुटीस्वार ठार

बाळापूर (अकोला), दि. २३ : शहराच्या पूर्वेकडील अकोला नाक्याजवळ हैद्राबादकडून येणार्‍या ट्रेलरच्या खाली स्कुटीस्वार ठार झाल्याची घटना आज सकाळी ११.३0 ला घडली. प्राप्त माहितीनुसार ट्रेलर नं. पी बी 0३ ए एफ ७३९५ हा हैद्राबादकडून अकोला नाक्याला वळसा घेत असताना समोरुन येणार्‍या स्कुटीवरून नात व नातु यांना शाळेतून घरी परत आणत असताना स्कुटी नं.एम एच .३0 के. ९४५0 ने जाणार्‍या शौकत अली इनायत अली हे वळसा घेत असलेल्या ट्रेलरच्या मागील चाकात आल्याने जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण ते वाचू शकले नाहीत. तर नात व नातु दोघेही दूर फेकल्या गेल्याने जखमी झाले. या मार्गावर मोठय़ा प्रमाणात पडलेले खड्डे वाचवताना स्कुटीस्वार वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.

Web Title: ScrubShawar killed in a trailer crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.