शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
3
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
4
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
5
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
6
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
7
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
8
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
9
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
10
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
11
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
12
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
13
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
14
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
15
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
16
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
17
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
18
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
19
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

शासनाकडून निधीला कात्री; मनपाकडून अनावश्यक उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:24 AM

शासनाच्या निर्देशाला झुगारत कमिशनखोरीची चटक लागलेल्या महापालिकेने अनावश्यक कामांवर उधळपट्टीचे धोरण अंगीकारल्याचे समोर आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी २३ जून ते ३१ मेपर्यंत लागू केलेल्या टाळेबंदीमुळे राज्य शासनाच्या तिजोरीतील गंगाजळी आटल्याने यंदा अत्यावश्यक विकास कामे वगळता इतर सर्व विकास कामांच्या निधीला शासनाने कात्री लावण्याचे निर्देश जारी केले आहेत. शासनाच्या निर्देशाला झुगारत कमिशनखोरीची चटक लागलेल्या महापालिकेने अनावश्यक कामांवर उधळपट्टीचे धोरण अंगीकारल्याचे समोर आले आहे. वीज बचतीच्या नावाखाली मनपा कार्यालयांतील जुने विद्युत साहित्य बदलण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मनपाची ठरावीक यंत्रणा दिवसरात्र इमानेइतबारे कामाला लागल्याचे चित्र असताना काही झारीतील शुक्राचार्य कोरोनाच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त निधीवरही डल्ला मारण्याची संधी सोडत नसल्याची माहिती आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशासह राज्याची अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी चालू आर्थिक वर्षात केवळ अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. तसेच नागरी स्वायत्त संस्थांनी यंदा केवळ ३३ टक्के निधीतून विकास कामे करणे अपेक्षित आहे; परंतु या सर्व निर्देशांना केराची टोपली दाखवत कमिशनखोरीची चटक लागलेल्या मनपातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अर्थकारण केल्या जात आहे. आवश्यकता नसताना मनपा कार्यालयातील जुने विद्युत साहित्य बदलण्याचा घाट रचण्यात आला असून, त्यावर २५ लाख रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. प्रशासनाकडून तसा प्रस्ताव तयार करीत २३ जून रोजी आयोजित स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

म्हणे शासनाचा निधी परत जाईल! मनपा कार्यालयातील विद्युत साहित्य बदलण्यासाठी प्रशासनाला २०१८-२०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकरणकडून २५ लाखांचा निधी प्राप्त झाला. यासाठी मनपाने आजवर सहा वेळा निविदा प्रकाशित केल्या. हा निधी २०१९-२०२० मध्ये परत जाणार असल्याची सबब पुढे करीत मनपाकडून अनावश्यक कामावर उधळपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

सत्तापक्षाच्या भूमिकेकडे लक्ष सत्ताधारी भाजपाकडून नेहमीच मनपाच्या व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या जात असल्याचा दावा केला जातो. कोरोनाच्या संकटात अनावश्यक कामांवर होणाºया उधळपट्टीला सत्ताधारी चाप लावणार की मनपाच्या कमिशनखोरीला संमती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका