शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

विज्ञान शिक्षकाच्या बोन सपोर्टर बाईक बेल्टला मिळाले पेटंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:45 PM

अकोट तालुक्यातील उमरा येथील लोकमान्य विद्यालयातील विज्ञान शिक्षक गजानन राजाराम चव्हाण यांनी संशोधन करून बोन सपोर्टर बाईक बेल्ट बनविला. या बेल्टला केंद्र शासनाकडून पेटंट मिळाले आहे.

- नितीन गव्हाळे

अकोला: रस्त्यावर दुचाकीस्वाराला खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराला कंबर, पाठदुखी, मणक्यांची झिजसारख्या आजारांसोबत स्पॉन्डीलायटीससारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. या आजारातून दुचाकीस्वारांची सुटका व्हावी, या दृष्टिकोनातून दोन वर्षांपूर्वी अकोट तालुक्यातील उमरा येथील लोकमान्य विद्यालयातील विज्ञान शिक्षक गजानन राजाराम चव्हाण यांनी संशोधन करून बोन सपोर्टर बाईक बेल्ट बनविला. या बेल्टला केंद्र शासनाकडून पेटंट मिळाले आहे.दुचाकी चालविताना चालकाच्या पाठीला, कंबर, मणक्यांना, मानेला झटके बसतात. त्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, स्पॉन्डीलायटीससारखे आजार झाले आहेत. रुग्णालयांमध्ये हाडांच्या आजारांनी ग्रस्त असलेले शेकडो रुग्ण आढळून येतात. अनेक रुग्णांवर शस्त्रक्रियासुद्धा कराव्या लागतात. त्यामुळे अस्थिरोग तज्ज्ञसुद्धा चालकांना दुचाकी चालविताना काळजी घेण्याचा किंवा दुचाकी न चालविण्याचा सल्ला देतात. दुचाकीचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, त्यांची या त्रासातून मुक्तता करावी. या दृष्टिकोनातून गजानन चव्हाण या शिक्षकाने बोन सपोर्टर बाईक बेल्ट तयार केला. विज्ञान प्रदर्शनामध्ये या बेल्ट पाईकचे परीक्षकांनीसुद्धा कौतुक केले. डीआरडीओचे वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर यांनी त्यांनी या बेल्टला पेटंट मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार गजानन चव्हाण यांनी २0१७ मध्ये पेटंट मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या पेटंट अ‍ॅप्लिकेशन पब्लिकेशनकडे आॅनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार त्यांच्या अनोख्या बेल्टला पेटंट मिळाले आहे. पेटंट मिळाल्यामुळे त्यांच्या बाईक बेल्ट निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटTeacherशिक्षक