‘सायन्स एक्स्प्रेस’चा अकोल्यात दोन दिवस मुक्काम!

By ram.deshpande | Published: July 26, 2017 02:31 AM2017-07-26T02:31:37+5:302017-07-26T02:32:09+5:30

Science Express stay in Akola for two days! | ‘सायन्स एक्स्प्रेस’चा अकोल्यात दोन दिवस मुक्काम!

‘सायन्स एक्स्प्रेस’चा अकोल्यात दोन दिवस मुक्काम!

Next
ठळक मुद्दे२९ जुलैचा मूर्तिजापूरचा थांबा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘लोकमत’च्या माध्यमातून करण्यात आलेला पाठपुरावा आणि खासदारांनी केलेल्या प्रयत्नांती, भारतीय रेल्वे प्रशासनाने ‘सायन्स एक्स्प्रेस’ला २७ आणि २८ जुलै रोजी अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी २९ जुलै रोजी मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर थांबणार आहे.
‘लोकमत’च्या माध्यमातून पश्चिम वैदर्भीयांनी ‘सायन्स एक्स्प्रेस’ला अकोला रेल्वेस्थानकावर थांबा देण्याची मागणी केली होती. यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांती रेल्वे बोर्डाने ‘सायन्स एक्स्प्रेस’ला २७ आणि २८ जुलै रोजी अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जुलै रोजी नाशिकवरून निघालेली ही गाडी २६ जुलै रोजी धुळे रेल्वेस्थानकावर थांबून गुरुवार २७ रोजी पहाटे अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचेल. अकोल्यात दाखल झाल्यानंतर ही गाडी नेमकी कुठल्या फलाटावर थांबवायची, असा प्रश्न स्थानिक मध्य रेल्वे अधिकाºयांना पडला होता. तो मार्गी लागला असून, ‘सायन्स एक्स्प्रेस’ला २७ जुलै रोजी द. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक ४ वर, तर २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक ३ वर थांबविले जाणार आहे. रेल्वे रुळावर धावणाºया १६ वातानुकूलित डब्यांमधील वैज्ञानिक प्रदर्शन बघण्यासाठी अकोलेकरांचीच नव्हे, तर बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विज्ञान प्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शाळा महाविद्यालयांच्या वेगवेगळ्या वेळा लक्षात घेऊन सकाळी १0 ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन खुले ठेवण्यात येणार आहे. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना रेल्वे प्रशासनाने दोन्ही दिवस रेल्वेस्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देष दिले आहेत. तर विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी येणाºयांकरिता रेल्वे प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था द. मध्य रेल्वेस्थानकाच्या परिसरात करण्यात आली आहे. तर नियोजित वेळापत्रकानुसार ‘सायन्स एक्स्प्रेस’ला २९ जुलै रोजी मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या माहिती अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.

खासदारांनी केले आवाहन
विविध सुविधांसोबतच रेल्वे प्रशासनाच्यावतीने सामाजिक दायित्व ओळखून नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जातात. जागतिक पर्यावरण बदलाची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी या दृष्टिकोनातून केंद्रीय रेल्वे प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा जास्तीत जास्त शाळा-महाविद्यालीन विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पलकांनी व शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले आहे.

Web Title: Science Express stay in Akola for two days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.