मुक्त विद्यालय मंडळामुळे शाळा बंद पडतील!
By Admin | Updated: July 17, 2017 03:00 IST2017-07-17T03:00:05+5:302017-07-17T03:00:05+5:30
शत्रुघ्न बिडकर यांचा आंदोलन करण्याचा इशारा

मुक्त विद्यालय मंडळामुळे शाळा बंद पडतील!
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी: शालेय शिक्षण मंत्रालयाने राज्यात मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा अध्यादेश काढला. हा तर महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा बंद करण्याचा घाट असल्याचे उद्गार विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी काढले.
शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील वर्ग ५, ८ वी आणि दहावी व बारावीकरिता मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत न जाता खासगीरीत्या परीक्षेला फॉर्म भरता येईल, अशा प्रकारची नवीन योजना आणली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक, दलितवर्ग यामुळे शिक्षणापासून वंचित राहणार असून माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित शाळा बंद पडणार आहेत. शासनाच्या मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम कायदा २००९ नुसार १४ वर्षाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी एकीकडे शासनाची असताना दुसरीकडे मुक्त विद्यालय मंडळ सारखे नवीन कल्पना या शासन स्तरावर होत असून यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जे विद्यार्थी शाळाबाह्य आहेत १०, १२ वी परीक्षा उत्तीर्ण नाहीत, त्यांच्याकरिता अगोदरच खासगीरीत्या फॉर्म नं. १० भरून त्यांना मंडळामार्फत परीक्षा देण्याची योजना असताना ही आणलेली योजना केवळ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा बंद करणे हा मुख्य उद्देश शासनाचा असू शकतो. शासनाच्या कायद्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र माध्य. व उच्च माध्यमिक संयुक्त मंडळ विरोधात आंदोलन करणार असल्याचे विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, कार्याध्यक्ष अशोक पारधी, सचिव सतीश जगताप, उपाध्यक्ष मंदा उमाठे, विनोद संगीतराव, विलास भारसाकळे, धावडे, सहसचिव दिनेश तायडे, मंगेश धानोरकर, राजू साखरकर, राजकुमार बालपांडे, उदय देशमुख, हरिभाऊ खोडे, संजय नारलावार, महेंद्र मेश्राम, विजय पल्होडे, भुमन्ना गोमटीवार, पद्मावती टिकार, नाझरा पटेल, शालिनी वाळके, कल्पना धोत्रे, मंगला वडतकर, प्रवीचा शहा, सुनील नायक, सुनील कुन्हेवार, मुकुंद मशाछत्री, अविनाश ढोमशे, भाऊराव पत्रे, बळीराम झामरे, प्रकाश बुमकाळे, विभा भुसारी, आदींनी या आदेशाचा निषेध केला असल्याचे संघटनेचे सचिव सतीश जगताप यांनी कळविले आहे.