शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहन भत्ता योजनेतील पात्र विद्यार्थिनींची माहिती देण्यास अकोला जिल्ह्यातील शाळा उदासीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:24 IST

अकोला : अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुलींना प्रोत्साहन भत्ता योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा टाळाटाळ करीत आहेत.

ठळक मुद्दे प्रोत्साहन भत्ता योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा टाळाटाळ करीत आहेत.जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया शेकडो विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला आहे. दोन वर्षांपासून शाळांनी विद्यार्थिनींची माहितीच शिक्षण विभागाकडे सादर केली नसल्यामुळे हा निधी पडून आहे आणि शाळांच्या उदासीनतेमुळे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे.

अकोला : अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुलींना प्रोत्साहन भत्ता योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा टाळाटाळ करीत आहेत. या शाळांच्या उदासीनतेमुळे प्रोत्साहन भत्ता योजनेसाठी पात्र ठरल्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.शाळांमधील विद्यार्थिनींचे प्रमाण वाढविण्याच्या आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने शासनाने अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. माध्यमिक शाळेत शिकणाºया विद्यार्थिनी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. या विद्यार्थिनींनी दहावी उत्तीर्ण केल्यासोबतच त्यांच्या बँक खात्यांची माहिती शाळांनी देणे आवश्यक आहे. परंतु शाळा विद्यार्थिनींची माहितीच देत नसल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया शेकडो विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला आहे. परंतु, दोन वर्षांपासून शाळांनी विद्यार्थिनींची माहितीच शिक्षण विभागाकडे सादर केली नसल्यामुळे हा निधी पडून आहे आणि शाळांच्या उदासीनतेमुळे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी शाळांना वारंवार पत्र, सूचना दिल्यानंतरही शाळा माहिती सादर करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील ९0 शाळांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थिनींची माहिती सादर करण्यास बजावले आहे. यानंतरही शाळांनी माहिती सादर न केल्यास, विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहतील आणि त्याची जबाबदारी ही शाळांची राहील, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाeducationशैक्षणिक