प्रवाशावर हल्ला करणारे बालसुधारगृहात

By Admin | Updated: June 24, 2016 00:37 IST2016-06-24T00:37:41+5:302016-06-24T00:37:41+5:30

तीन अल्पवयीनांनी मोबाइल चोरी करताना केला होता इसमावर हल्ला.

In the schoolroom that attacked the passenger | प्रवाशावर हल्ला करणारे बालसुधारगृहात

प्रवाशावर हल्ला करणारे बालसुधारगृहात

अकोला: कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगाव खान्देश येथे जात असलेले अविनाश मोहन पाटील यांच्या हातातील मोबाइल पळविण्यासाठी त्यांच्यावर लाठीहल्ला करणार्‍या तीन अल्पवयीनांची न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली. या अल्पवयीन चोरट्यांचा म्होरक्या गुड्ड नामक मोबाइल चोर अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पाटील हे महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगाव येथे जात असताना ते बोगीच्या गेटमध्ये मोबाइलवर बोलत उभे होते. आकोट फैल पुलानजीक पटरीवर उभ्या असलेल्या तिघांनी पाटीलवर काठीने हल्ला चढविला होता. या हल्लय़ामुळे अविनाश पाटील यांच्या हातातील मोबाइल खाली पडला. मोबाइल पकडण्यासाठी गेलेल्या पाटील यांचाही तोल गेल्याने ते रेल्वेखाली कोसळले होते. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी संशयावरून तीन आरोपींना अटक केली. या आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता तीनही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर या तिघांचा सूत्रधार गुड्ड नामक चोरटा अद्याप फरार आहे.

Web Title: In the schoolroom that attacked the passenger