शालेय पोषण आहार शिजविणारे अडचणीत
By Admin | Updated: May 21, 2015 01:43 IST2015-05-21T01:43:47+5:302015-05-21T01:43:47+5:30
राज्यात पाच लाख कर्मचारी; थकीत मानधनासाठी आंदोलनाचा इशारा

शालेय पोषण आहार शिजविणारे अडचणीत
हर्षनंदन वाघ/ बुलडाणा :आधीच महागाई, त्यात अत्यल्प मानधन आणि तेही वेळेवर मिळत नसल्याने शालेय पोषण आहार शिजविणार्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्यात अशीच परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र आहे. त्यामुळे शासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. शासनाने यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजविण्याचे काम मदतनीस आणि स्वयंपाकी करीत आहेत. त्यांना केवळ एक ते दोन हजार रुपये मानधन दिले जाते. तेही वेळेवर मिळत नसल्याने मानधनावरील या कर्मचार्यांची उपासमार होत आहे. सध्या चार महिन्यांचे मानधन शासनाकडे थकले आहे. हे थकलेले मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी या कर्मचार्यांनी केली आहे. *असे मिळते कर्मचा-यांना मानधन शासननिर्णय २0११ नुसार २५ विद्यार्थ्यांमागे खिचडी शिजविणार्या कर्मचार्याला एक हजार रुपये दरमहा मानधन म्हणजे दिवसाला फक्त ३३ रुपये रोज पडतो. यात केंद्र सरकारचा ७५0 रुपये आणि राज्य सरकारचा २५0 रुपये वाटा आहे. २५ ते २00 विद्यार्थ्यांपर्यंत दोन हजार रुपये मानधन दिले जाते. राज्यात सन २0१४-१५ मध्ये २ लाख ७३ हजार कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, शासनाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांची संख्या जवळपास पाच लाख झाली असून, तुटपुंज्या मानधनावर काम करणारे कर्मचारीन्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. *बुलडाणा जिल्ह्यात ४00 कर्मचारी बुलडाणा जिलत पोषण आहार शिजविणार्या कर्मचार्यांची संख्या ४00 आहे. त्यांना मागील मार्च, एप्रिल आणि चालू मे महिन्याचे मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी शालेय पोषण आहार शिजविणार्यांची जनहित कल्याणकारी संघटनेने केली आहे. दरम्यान, मानधन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवनकार, संस्थापक अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष भागवत यांनी दिला.