मनपा आयुक्तांनी घेतली संगणक चालकांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:43+5:302021-04-16T04:18:43+5:30

संगणक चालकांची नियुक्ती कशी? महापालिकेत वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मध्ये पदाेन्नती देताना संगणक हाताळण्याची अट नमूद करण्यात ...

The school of computer operators was taken over by the Municipal Commissioner | मनपा आयुक्तांनी घेतली संगणक चालकांची शाळा

मनपा आयुक्तांनी घेतली संगणक चालकांची शाळा

संगणक चालकांची नियुक्ती कशी?

महापालिकेत वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मध्ये पदाेन्नती देताना संगणक हाताळण्याची अट नमूद करण्यात आली आहे़ अर्थात आजवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मध्ये पदाेन्नती मिळाली असेल तर त्यांना संगणक हाताळता येते,असे गृहीत धरणे अपेक्षित आहे़ असे असताना मानधन, कंत्राटी तत्वावर संगणक चालकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आर्थिक बाेजा मनपाने का घ्यावा, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे़

संगणक चालकांची धावाधाव

पितळ उघडे पडल्याने कामावरून कमी केले जाणार असल्याच्या धास्तीपाेटी काही संगणक चालकांनी काही पदाधिकारी, नगरसेवक तसेच मर्जीतल्या विभाग प्रमुखांकडे धावाधाव केल्याची माहिती आहे़ मनपाच्या अनेक विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींचा यामध्ये समावेश आहे़

Web Title: The school of computer operators was taken over by the Municipal Commissioner