शालेय विद्यार्थ्यांना गावागावात ८ मे पासून मिळणार आधारकार्ड!
By Admin | Updated: May 6, 2015 00:34 IST2015-05-06T00:34:36+5:302015-05-06T00:34:36+5:30
प्रभातफेरीने शुभारंभ: पालकांमध्ये जनजागृती करणार

शालेय विद्यार्थ्यांना गावागावात ८ मे पासून मिळणार आधारकार्ड!
खामगाव : शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्याचे अभियान राज्य शासनाने हाती घेतले असून या अभियानाला ८ मेपासून प्रारंभ होणार आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ मध्ये लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालक शाळेत आल्याशिवाय आणि नियमितपणे शाळेत उपस्थित राहून दज्रेदार शिक्षण घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याला पुर्णत्व प्राप्त होणार नाही. त्यामुळे तळागाळातील प्रत्येक बालकाला शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. यापूर्वीही राज्य शासनाकडून शाळाबाह्य मुलांसाठी नवजीवन केंद्र चालविण्यात आले. तथापि, हे प्रयोग फारसे यशस्वी न ठरल्यामुळे २१ एप्रिल २0१५ पासून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची मोहिम शासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी गावागावात ८ मे रोजी प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. आधारकार्डसंदर्भात पालकांमध्ये जनजागृती करण्यात आहे.