भीषण आगीत स्कूल बस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST2021-04-12T04:17:13+5:302021-04-12T04:17:13+5:30

अकोला : सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात असलेल्या पोद्दार स्कूलच्या एका स्कूल बसला आग लागून बस जळून ...

The school bus caught fire | भीषण आगीत स्कूल बस जळून खाक

भीषण आगीत स्कूल बस जळून खाक

अकोला : सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात असलेल्या पोद्दार स्कूलच्या एका स्कूल बसला आग लागून बस जळून खाक झाल्याची ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. मनपाच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

पोद्दार इंग्लिश स्कूलच्या आवारात गत अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या स्कूल बसपैकी एका स्कूलबसला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीत स्कूलबस जळून खाक झाली. रात्री उशिराची वेळ असल्याने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यास वेळ झाला; मात्र अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेऊन आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच ही आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत स्कूलबस जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महानगरपालिकेच्या एका बंबाद्वारे ही आग नियंत्रणात आणण्यात आली. यावेळी सिव्हील लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: The school bus caught fire