पातूर येथे साकारला भारत की आझादी अमृत महोत्सवाचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:20 IST2021-09-18T04:20:53+5:302021-09-18T04:20:53+5:30

गेल्या २२ वर्षांपासून नामदेवराव मो. राखोंडे गुरुजी यांनी पातुर शहरात धार्मिक, पारंपरिक व सामाजिक, सांस्कृतिक संदेश देणारे देखावे साकारत ...

Scene of India or Independence Amrut Mahotsav at Pathur | पातूर येथे साकारला भारत की आझादी अमृत महोत्सवाचा देखावा

पातूर येथे साकारला भारत की आझादी अमृत महोत्सवाचा देखावा

गेल्या २२ वर्षांपासून नामदेवराव मो. राखोंडे गुरुजी यांनी पातुर शहरात धार्मिक, पारंपरिक व सामाजिक, सांस्कृतिक संदेश देणारे देखावे साकारत असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना व मंडळाला महाराष्ट्र शासनाचा तालुका व जिल्हास्तरीय गणेशोत्सव सजावट पुरस्कार मिळाले आहे. ही परंपरा त्यांचे मुले सागर राखोंडे व विशाल राखोंडे यांनी चालू ठेवली आहे. गेला ९ वर्षांपासून प्रतिष्ठान व गणेशोत्सवाची नोंदणी करून १० दिवसीय युवा महोत्सव व सांस्कृतिक व सामाजिक कार्य तसेच विविध उपक्रम राबवित आहेत.

फोटो:

महापुरुषांना समर्पित देखावा

यावर्षीचा अमृत महोत्सवाचा देखावा हा भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणारे वीर सेनानी व थोर महात्मे व महिला व पुरुषांना समर्पित केला असून हा देखावा हा सागर राखोंडे, विशाल राखोंडे, पल्लवी मांडवगणे, शुभांगी उमाळे व ज्योती राखोंडे व राखोंडे परिवारांच्या संकल्पनेतून तयार केला आहे.

Web Title: Scene of India or Independence Amrut Mahotsav at Pathur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.