शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

‘युरिया’चा तुटवडा; शेतकर्‍यांना हेलपाटे

By admin | Published: September 14, 2014 1:39 AM

अकोला जिल्ह्यात युरियाचा तुटवडा, पिके पडू लागली पिवळी.

अकोला: अति पावसामुळे पिके पिवळी पडू लागली असून, पिकांना जगविण्यासाठी युरिया खताची मागणी वाढली आहे; मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने, ह्ययुरियाह्णसाठी शेतकर्‍यांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यानुषंगाने खतसाठा बाजारात उपलब्ध होण्याची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात आहे.गेल्या महिनाभरापासून अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे; तसेच गेल्या ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतवृष्टी झाली. त्यामुळे शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी व इतर पिके पिवळी पडू लागली आहेत. पिवळ्या पडणार्‍या पिकांसाठी आवश्यक असलेल्या ह्ययुरियाह्ण खतासाठी शेतकर्‍यांकडून मागणी वाढली आहे. युरिया खताची मागणी वाढली असली तरी, त्या तुलनेत गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात युरिया खताचा पुरवठा होत नसल्याने, जिल्ह्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या ७ ते १३ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार २00 मेट्रिक टन युरिया खतसाठा राष्ट्रीय केमिकल्स अँन्ड फर्टिलायझर्स (आरसीएफ) कंपनीकडून प्राप्त झाला. उपलब्ध झालेला हा खतसाठा संपुष्टात आला आहे. बाजारात खतसाठा उपलब्ध नसल्याने, युरिया खत घेण्यासाठी बाजारात येणार्‍या शेतकर्‍यांना खत मिळत नसल्याने, आल्या पावलीच परतावे लागत आहे. त्यामुळे युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर पिवळे पडणार्‍या पिकांना जगविण्यासाठी युरिया खतसाठा बाजारात केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात आहे.