शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यात औषधांचा तुटवडा; ५५ टक्के औषधांचा अद्यापही पुरवठा नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:18 IST

अकोला: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती बिकट असल्याची माहिती आहे.

- प्रवीण खेतेअकोला: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती बिकट असल्याची माहिती आहे. गत वर्षभरात हाफकीनमार्फत औषधांसाठी ४८० कोटींची आॅर्डर देण्यात आली होती. त्यापैकी केवळ ४० ते ४५ टक्के औषधेच विविध वैद्यकीय महाविद्यालयांना मिळाले असून, ५५ टक्के औषधे अजूनही बहुतांश ठिकाणी पुरविण्यात आले नाहीत. त्यामुळे गरिबांसाठी आजाराचा उपचार महागडा झाला आहे.वैद्यकीय उपकरणांसह औषधे खरेदीमध्ये आर्थिक बचत व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी शासनाने हापकीनमार्फत औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली होती. तत्पूर्वी औषधे खरेदी बंद असल्याने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सर्वोपचार रुग्णालयांमध्ये औषधांची चणचण भासू लागली होती. मान्यता मिळाल्यानंतर गत सहा महिन्यांपूर्वी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयांकडून औषधांच्या मागणीला सुरुवात झाली; परंतु अद्यापही ५५ टक्के औषधे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांवर उपचारासाठी औषधेच नाहीत.२०० कोटींच्या वैद्यकीय उपकरणांची मागणीऔषधांसोबतच हापकीनकडे २०० कोटींच्या वैद्यकीय उपकरणांची मागणी राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय माहविद्यालयांमधून करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १५ ते २० टक्के वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सीटीस्कॅन, व्हेंटिलेटर यासारख्या मोठ्या वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. १५० कोटींच्या वैद्यकीय उपकरणांवर आवश्यक चाचण्या घेण्याचे काम सुरू असून, एप्रिल २०१९ पर्यंत ही उपकरणेदेखील राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालयांना पुरविण्यात येणार असल्याची माहिती हाफकीनमार्फत सांगण्यात आली.या औषधांचा तुटवडापॅरासिटामॉल, टॅब सिप्रो, अ‍ॅमॉक्सीलीन, सिट्रीझीन, अ‍ॅम्लोडीपीन, (शुगर) मेटफॉरमीन, इन्शुलीन, डायक्लोफीनॅक, क्लोट्रीमॅझोल,ओआरएस पावडर. 

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालयाच्या मागणीनुसार औषधांसाठी ४८० कोटींची आॅर्डर दिली आहे. त्यापैकी ४० ते ४५ टक्के औषधे पुरवठा झाला आहे. उर्वरित औषधसाठा जानेवारीपर्यंत पुरविण्यात येईल. शिवाय, एप्रिलपर्यंत वैद्यकीय उपकरणेही पुरविण्यात येतील.- परमेश्वर कोगमोरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, हाफकीन, मुंबई.

 

टॅग्स :AkolaअकोलाmedicinesऔषधंVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा