दग्र्यावरील चादर फडफडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:04 IST2017-08-25T01:02:38+5:302017-08-25T01:04:01+5:30

पंचगव्हाण : तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपूर येथील मिर सैयद युसूफ नेकनामबाबा यांची पुरातन दग्र्यावरील चादर फडफडत असल्याचा प्रकार २२ ऑगस्टपासून सुरू आहे. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील मुस्लीम बांधवांनी पंचगव्हाण येथे एकच गर्दी केली. तसेच चादर फडफडण्याची घटना २४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत सुरू होती. 

The scaffold was fluttered! | दग्र्यावरील चादर फडफडली!

दग्र्यावरील चादर फडफडली!

ठळक मुद्देपंचगव्हाण येथे भाविकांनी केली गर्दीपाहण्यासाठी परिसरातील मुस्लीम बांधवांनी पंचगव्हाण येथे गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचगव्हाण : तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपूर येथील मिर सैयद युसूफ नेकनामबाबा यांची पुरातन दग्र्यावरील चादर फडफडत असल्याचा प्रकार २२ ऑगस्टपासून सुरू आहे. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील मुस्लीम बांधवांनी पंचगव्हाण येथे एकच गर्दी केली. तसेच चादर फडफडण्याची घटना २४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत सुरू होती. 
पंचगव्हाण येथील नरसीपूर या गावात मिर सैयद युसूफ नेकनाम बाबा यांची पुरातन दर्गा आहे. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता नमाज अदा झाल्यावर नेकनाम बाबा यांच्या दग्र्यावर चादर हलत असल्याचे काही मुस्लीम बांधवांना आढळले. ही बाब गावात वार्‍यासारखी पसरली. खात्री करण्यासाठी लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली. 
२४ ऑगस्ट रोजी अमरावती, नागपूर, शेगाव, पातूर, बाळापूर आदी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यावेळी मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. 

आपोआप असे काही घडत नाही. या घटनेमागे काही तरी कारण असायला हवे. त्या कारणाचा शोध घेतला म्हणजे ही घटना का घडली, हे स्पष्ट होणार आहे. हा चमत्कार नाही. 
- अशोक घाटे, राज्य संघटक, अंनिस 

Web Title: The scaffold was fluttered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.