खिचडीत किडे
By Admin | Updated: August 4, 2014 00:12 IST2014-08-04T00:12:07+5:302014-08-04T00:12:07+5:30
दहीगाव : शाळा मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस

खिचडीत किडे
नांदुरा: तालुक्यातील ग्राम दहीगाव येथील गाडगे महाराज विद्यालयाला केंद्रप्रमुख हिवाळे यांनी ३0 जुलै रोजी भेट देवून पाहणी केली असता खिचडीमध्ये सोंडे, किटक आढळून आले. याप्रकरणी केंद्र प्रमुखाच्या अहवालावरून गटशिक्षण अधिकारी पडोळ यांनी गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत सविस्तर असे की, नांदुरा येथून अगदी जवळच असलेल्या ग्राम दहीगाव येथे गाडगे महाराज विद्यालयात जिल्हा परिषद केंद्रीय शाळा खुमगावचे केंद्रप्रमुख यांनी ३0 जुलै रोजी शाळेला भेट दिली. केंद्रप्रमुखांनी पोषण आहाराची तपासणी केली असता शिजवून आणलेल्या खिचडीमध्ये सोंडे व किटक आढळून आले. विशेष म्हणजे केंद्रप्रमुख यांनी वारंवार मागणी करूनही मागील वर्षाचे तसेच सध्याचे अभिलेखे तपासणी करीता उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. स्टॉकबुक माहे मार्च २0१४ पासून अपूर्ण असल्याचे निदर्शनात आले आहे. शाळा स्तरावर ठेवण्यात येणारे अभिलेखे अपूर्ण असणे, सनियंत्रण समितीची स्थापना न करणे, शिक्षक पालक संघ स्थापन न करणे, अन्न शिजवणार्या यंत्रणेबाबत आवश्यक ती सर्व कार्यालयीन प्रक्रिया पुर्ण न करणे जसे करारनामा वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही . या प्रकरणी केंद्रप्रमुखांनी गटशिक्षणाधिकार्यांना दिलेल्या अहवालावरून मुख्याध्यापकांना वरील सर्व त्रुटीबाबतचा खुलासा सात दिवसाच्या आत सादर करावा, अन्यथा प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आली आहे.