शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

‘बंद’मुळे शाळांमध्ये सावित्रीबाई फुले जयंती गुरुवारी साजरी होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:14 IST

३ जानेवारी रोजी अकोला जिल्हय़ात बंद पाळण्यात आल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा झाला नाही.  ४ जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालयांमध्ये जयंती उत्सव साजरा करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. 

ठळक मुद्देबंदमुळे ३ जानेवारी रोजी अचानक शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती दिनापासून शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्याचा आदेश दिला आहे. परंतु, ३ जानेवारी रोजी अकोला जिल्हय़ात बंद पाळण्यात आल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा झाला नाही.  ४ जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालयांमध्ये जयंती उत्सव साजरा करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्या प्राधिकरणाने शिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या (३ जानेवारी) जयंती दिनापासून ते २६ जानेवारीपर्यंत शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यास सांगितले आहे. तसेच अभियानादरम्यान विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यक्रमांचे नियोजनसुद्धा दिले आहे. परंतु, कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने, ३ जानेवारी रोजी अचानक शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ४ जानेवारीपासून शाळांमध्ये प्रभात फेरी, पथनाट्य, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचा जीवन चरित्र परिचय द्यावा आणि बालिका दिनाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यावी. तसेच एकांकिका सादरीकरण, लघुपट दाखवावा, एक किंवा दोन कन्या अपत्यांवर थांबलेल्या माता, पित्यांचा सन्मान करावा.  माता मेळावा घ्यावा. विविध क्षेत्रात कार्यरत कर्तबगार महिलांचा सन्मान करावा. तसेच स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी प्रतिज्ञा द्यावी. यासह विविध उपक्रमांचे शाळेत आयोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

बंद आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी द्यावी लागली. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी ४ जानेवारीपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा करावा आणि शाळेमध्ये विविध उपक्रम राबवावेत आणि त्याचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवावा. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळा