माना येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST2021-01-08T04:57:12+5:302021-01-08T04:57:12+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाधान इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमिला ...

Savitribai Phule Jayanti celebration at Mana | माना येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

माना येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाधान इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमिला कोकणे, नलिनी मेटांगे, गीतांजली सरदार, सीमा खिराळे, शर्मिला तायडे आदी उपस्थित होते. यावेळी सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमात आशा सेविका वंदना मेटांगे, सुषमा चक्रे, चंदा गुडदे, अरुणा धर्मपाल चक्रे, अरुणा विलास कोकणे, ज्योती कोकणे, मनीषा चव्हाण, सुनीता आनंदा चक्रे, नलिनी राऊत आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता चक्रे यांनी केले. आभार माया पाटील यांनी मानले. कार्यक्रमात प्रमिला साखरकर, साधना अवझाडे, शीला वाकडे, माया पाटील, नंदा डांगे, पंचफुला पुंडगे, पुष्पा खंडारे, ममता पाखे, सविता खंडारे, मंगला लोखंडे, सुषमा टाक आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (फोटो)

Web Title: Savitribai Phule Jayanti celebration at Mana