नऊ गायींना जीवदान; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:20 IST2021-08-29T04:20:56+5:302021-08-29T04:20:56+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पडघान व त्यांचे सहकारी शनिवारी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना नऊ ...

Saving nine cows; Six lakh items confiscated | नऊ गायींना जीवदान; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

नऊ गायींना जीवदान; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंजर

पोलीस स्टेशनचे ठाणेदार पडघान व त्यांचे सहकारी शनिवारी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना नऊ गायींना कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भेंडी काझी- खेर्डा भागाई रस्त्याने जात असलेले मालवाहू (एम.एच. ३०, बी.डी. २७७४)चा पाठलाग करून थांबवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये निर्दयीपणे कोंबून ठेवलेल्या आठ गायी व एक वासरू आढळून आले. याप्रकरणी आरोपी अब्दुल मतीन अब्दुल नबी (रा. महान) यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार महादेवराव पडघान, जमादार भीकासिंग जाधव, पोलीस कॉन्स्टेबल भगवान शिंदे, संतोष हिराळकर, ज्ञानेश्वर राठोड, गोपाल आकोटकर, सतीश कथे, मुकेश जाधव, भगवान मात्रे, आदींनी केली आहे.

Web Title: Saving nine cows; Six lakh items confiscated