जिल्हाधिकारीपदाचा प्रभार सौरभ कटियार यांच्याकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:19+5:302021-09-24T04:23:19+5:30

अकोला : जिल्हाधिकारी नीमा अरोरा टेनिस स्पर्धेसाठी दिल्लीला रवाना झाल्यामुळे गुरुवार, २३ ते २९ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी पदाचा प्रभार जिल्हा ...

Saurabh Katiyar in charge of the post of Collector! | जिल्हाधिकारीपदाचा प्रभार सौरभ कटियार यांच्याकडे!

जिल्हाधिकारीपदाचा प्रभार सौरभ कटियार यांच्याकडे!

अकोला : जिल्हाधिकारी नीमा अरोरा टेनिस स्पर्धेसाठी दिल्लीला रवाना झाल्यामुळे गुरुवार, २३ ते २९ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार कटियार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारीपदाचा प्रभार सांभाळला आहे.

दिल्ली येथे आयोजित सनदी अधिकाऱ्यांच्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी नीमा अरोरा २३ सप्टेंबर रोजी अकोला येथून दिल्लीकडे रवाना झाल्या. स्पर्धा आटोपल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी त्या अकोल्यात परतणार आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या आदेशानुसार २३ ते २९ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारीपदाचा प्रभार सांभाळला आहे.

Web Title: Saurabh Katiyar in charge of the post of Collector!