सॅटरडे क्लबचा क्रीडा उपक्रम कौतुकास्पद - पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:04+5:302021-02-05T06:15:04+5:30
अकोला: मैदानी खेळांचा गजर करणारा व महिला, पुरुष खेळाडूंना प्रोत्साहन देणारा सॅटरडे क्लबच्या क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत ...

सॅटरडे क्लबचा क्रीडा उपक्रम कौतुकास्पद - पोलीस अधीक्षक
अकोला: मैदानी खेळांचा गजर करणारा व महिला, पुरुष खेळाडूंना प्रोत्साहन देणारा सॅटरडे क्लबच्या क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी व्यक्त केले.
सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेचा थाटात समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर बोलत होते. अकोला पोलीस दलाची क्रिकेट चमू ही विजेती ठरली, तर कॅटरिंग किंग ही चमू उपविजेती ठरली. या दोन दिवसीय क्रिकेट पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे शाखेचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या स्पर्धेत तब्बल दहा क्रिकेटच्या चमूनी सहभाग घेत प्रदर्शन करीत जल्लोष निर्माण केला. उपांत्य फेरीतील सामना कॅटरिंग क्वीन चमू व रौनक टेन यामध्ये रंगला. यात कॅटरिंग क्वीन विजेता ठरली, तर द्वितीय उपांत्य फेरी अकोला पोलीस व माहेश्वरी प्रगती मंडळ यामध्ये रंगली. यात अकोला पोलीस विजेती ठरले. विजेता चमूला सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ट्राॅफी व रोख ६,६६६ रुपये पुरस्कार बहाल करण्यात आला तर उपविजेता कॅटरिंग किंगला रुपये ४,४४४ रोख व ट्रॉफी बहाल करण्यात आली. या समारोपीय सोहळ्यात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, रमाकांत खेतान, चेंबर अध्यक्ष नितीन खंडेलवाल, नगरसेवक आशिष पवित्रकार, सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट अकोला शाखेचे अध्यक्ष ॲड. देवेन अग्रवाल, रिजनल हेड सुभाष गोरे, क्लब सचिव मुकेश मेर, कोषाध्यक्ष महेश मुंदडा आदी उपस्थित होते. या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत माजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. विप्लव बाजोरिया, आ. अमोल मिटकरी, हरीश अलीमचंदानी, गिरीश गोखले, डॉ.आर बी हेडा, पवन माहेश्वरी, अग्रवाल समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष निकेश गुप्ता, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे प्रदेश पदाधिकारी प्रा. रमण हेडा, माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष सागर लोहिया आदींनी सहकार्य केले. (फोटो)