मूर्तिजापूर तालुक्यातील सरपंचांचे आरक्षण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST2021-02-05T06:12:32+5:302021-02-05T06:12:32+5:30

तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे अनुसूचित जाती, जमाती तसेच ...

Sarpanch reservation in Murtijapur taluka coming soon | मूर्तिजापूर तालुक्यातील सरपंचांचे आरक्षण लवकरच

मूर्तिजापूर तालुक्यातील सरपंचांचे आरक्षण लवकरच

तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता यापूर्वी करण्यात आलेले आरक्षण शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आले असून, हे आरक्षण नव्याने निश्चित करण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय परीसरातील नवीन शासकीय धान्य गोदामात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.

Web Title: Sarpanch reservation in Murtijapur taluka coming soon