संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भटोरीत सरपंच, उपसरपंचाने केले पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST2021-02-27T04:24:55+5:302021-02-27T04:24:55+5:30

भाजपा नेते तथा कृउबास संचालक डॉ. अमित कावरे यांच्या विशेष उपस्थितीत भटोरी ग्रामपंचायत कार्यालयात पदग्रहण सोहळा पार पडला. सुरुवातीला ...

Sarpanch and Deputy Sarpanch of Bhatori took office on the occasion of Sanjay Dhotre's birthday | संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भटोरीत सरपंच, उपसरपंचाने केले पदग्रहण

संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भटोरीत सरपंच, उपसरपंचाने केले पदग्रहण

भाजपा नेते तथा कृउबास संचालक डॉ. अमित कावरे यांच्या विशेष उपस्थितीत भटोरी ग्रामपंचायत कार्यालयात पदग्रहण सोहळा पार पडला. सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सरपंच छबूताई भाऊराव मुरळ, उपसरपंच वर्षा रवींद्र भोंगळे यांनी पदग्रहण केले. त्यानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धनराज पंजाबराव कावरे, अन्नपूर्णा शंकरराव नागेश्वर, रुनाली विवेक कावरे यांचा डॉ.अमित कावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ.अमित कावरे यांच्या नियोजन व निर्देशानुसार गावातील विकासकामे मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच छबुताई मुरळ यांनी दिली.

संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात सर्व शासकीय योजनांचा लाभ ग्राम पंचायतीमार्फत ग्रामस्थांना मिळवून देण्याचे अभिवचन, या ग्रामपंचायतीत सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आणण्यात मध्यवर्ती भूमिका पार पाडणारे डॉ. अमित कावरे यांनी ग्रामस्थांना दिले.

पदग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचालन ग्रामसेवक गजानन भुस्कुटे यांनी केले. ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद कावरे, गजानन सोळंके व इतरांनी सोहळा आयोजनात पुढाकार घेतला. (फोटो) (वा.प्र.) ८ बाय १२

Web Title: Sarpanch and Deputy Sarpanch of Bhatori took office on the occasion of Sanjay Dhotre's birthday