सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार: युवतीला दिले मुदतबाहय़ औषध!
By Admin | Updated: August 18, 2016 02:11 IST2016-08-18T02:11:40+5:302016-08-18T02:11:40+5:30
अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ, युवतीची प्रकृती बिघडली.

सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार: युवतीला दिले मुदतबाहय़ औषध!
अकोला, दि. १७ : सर्वोपचार रुग्णालयामध्ये येणार्या गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोपचार रुग्णालयातील ज्या डॉक्टरने वृद्ध महिलेवर शस्त्रक्रिया केली, त्यानेच ती शस्त्रक्रिया चुकीची ठरविली. आता सर्वोपचार रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी गेलेल्या युवतीला एका महिला डॉक्टरने दोन महिन्यापूर्वीच मुदत संपलेले औषध दिले. त्यामुळे युवतीला डोके दुखण्यासोबतच चक्कर आल्याचा त्रास सुरू झाला. या घटनेवरून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर जीवघेणे प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पातूर येथे राहणारी भूमिका दामोदर राऊत ही युवती कान दुखत असल्याने, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात गेली. रीतसर पावती घेऊन ती ओपीडी क्रमांक ३४ मध्ये गेली. याठिकाणी महिला डॉक्टरने भूमिकाची तपासणी केली आणि तिला कानात औषध टाकण्यासाठी महिला डॉक्टरने स्वत:कडील ह्यओटोबायोटिकह्ण नावाचा ड्रॉप दिला. भूमिका उपचार व औषध घेतल्यानंतर घरी परतली. तिने महिला डॉक्टरने दिलेली औषध कानात टाकले; परंतु तिला बरे वाटण्याऐवजी डोके दुखायला लागले आणि चक्कर यायल्या लागल्यात. तसेच तिला फिट यायला सुरुवात झाली. झालेल्या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरून गेले. तिला लगतच्या डॉक्टरकडे नेले असता, त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील महिला डॉक्टरने दिलेले औषध तपासले असता, ते मुदतबाहय़ असल्याचे दिसून आले. भूमिका राऊत हिने यासंबंधीची तक्रार अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे केली. मुदतबाहय़ औषध दिल्यामुळे जीवाचे काही बरेवाईट झाले असते, तर कोण जबाबदार ठरले असते, असा प्रश्न भूमिका राऊत हिने उपस्थित केला. तिने महिला डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली. महिला डॉक्टरने औषध देण्यापूर्वी ते मुदतबाहय़ आहे किंवा नाही, याची तपासणीसुद्धा केली नाही. यावरून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांविषयी किती निष्काळजी आहेत, हे स्पष्ट होते.
दिलेले औषध सर्वोपचारमधील नसल्याचा दावा!
भूमिका राऊत हिला दिलेले 'ओटोबायोटिक' औषध सर्वोपचार रुग्णालयातील औषध भांडार विभागातील नसल्याचा दावा केला जात आहे. औषध भांडार विभागामध्ये कानासाठी ह्यसिरीकेईनह्ण नावाच्या औषधांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे युवतीला दिलेले औषध भांडार विभागाकडून दिलेलेच नाही, असा दावा तेथील कर्मचार्यांनी केला आहे. आमच्याकडून दिलेल्या औषधांवर ह्यगव्हर्मेंट सप्लाय, नॉट फॉर सेलह्ण असे लिहिलेले असते. युवतीकडे असलेल्या औषधीवर ह्यफिजिशियन सॅम्पलह्ण असे लिहिले आहे.
ह्यसर्वोपचारह्णमधील औषध भांडाराचे होते ऑडिट
सर्वोपचार रुग्णालयातील औषध भांडाराचे तीनदा ऑडिट होते. महालेखापाल नागपूर हे वर्षातून एकदा औषध भांडाराचे ऑडिट करतात. दुसरे ऑडिट हे लेखा व कोषागार विभागाकडून दर पाच वर्षांनी करण्यात येते आणि तिसरे ऑडिट हे औषध भांडार विभागाचे कर्मचारी महिन्यातून एकदा करतात, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
मी केलेल्या चौकशीनुसार युवतीला दिलेले मुदतबाहय़ औषध हे आमच्या रुग्णालयातील नाही. युवतीकडे असलेले औषध हे वैद्यकीय प्रतिनिधीकडील आहे. युवतीला हे मुदतबाहय़ औषध कोणी दिले, याबाबत आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू.
डॉ. राजेश कार्यकर्ते
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय