सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: March 6, 2015 02:19 IST2015-03-06T01:59:20+5:302015-03-06T02:19:09+5:30
चोरट्याने दिली अकोला व वाशिम जिल्ह्यात चो-या केल्याची कबुली.
_ns.jpg)
सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
वाशिम : वाशिम शहरातील दोन मेडिकल्स स्टोअर्सचे दुकान फोडून त्यामधील रोख ६८ हजार लंपास करणारा सराईत गुन्हेगाराचा वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचने शोध घेऊन त्याला ५ मार्च रोजी अटक केली. चार महिन्यांपूर्वी गुरुकृपा मेडिकलचे शटर तोडून त्यामधील रोख ५0 हजार रुपये व २ मार्च रोजी अथर्व मेडिकल्सचे शटर तोडून त्यामधील रोख १८ हजार ९00 रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याच्या तक्रारी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या चोरीचा तपास ठाणेदार संग्राम सांगळे यांनी डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर, एनपीसी सुनील पवार, राजेश बायस्कर, हरिष दंदे व मंगेश नरवाडे यांच्या पथकाला दिला. या पथकाने गेल्या १५ दिवसांपासून चोरट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर पोलिसांना मूर्तिजापूर तालुक्यातील पळसो बढे येथील आरोपी गजानन नरसिंगराव डाबेराव याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गजानन डाबेराव याने अकोला व वाशिम जिल्ह्यात बर्याच ठिकाणी चोर्या केल्याची कबुली दिली. गेल्या महिनाभरापासून वाशिम शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पकडलेल्या सराईत गुन्हेगारामुळे अनेक चोर्यांचा शोध लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.