शेतक-यांना मातीचा टिळा लावून जलपूजन!

By Admin | Updated: March 19, 2016 01:56 IST2016-03-19T01:56:05+5:302016-03-19T01:56:05+5:30

गांधीग्राम ते नेरधामणा जलदिंडीत शेकडो शेतकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग; कीर्तनातून जलप्रबोधन.

Saplings from the soil of the soil to the farmers! | शेतक-यांना मातीचा टिळा लावून जलपूजन!

शेतक-यांना मातीचा टिळा लावून जलपूजन!

अकोला: पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हय़ात १६ ते २२ मार्चपर्यंत एक आठवडा जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त जलजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाण्याचे संवर्धन करणे कसे महत्त्वाचे आहे, यासाठीचे प्रबोधन कीर्तन, कविता, कथा, कथनातून अर्थात मनोरंजनातून शेतकरी, नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. माथा ते पायथा, मूलस्थानी जलसंधारण करणे काळाची गरज असल्याचे शेतकर्‍यांना समजावून सांगितले जात आहे.
शुक्रवारी गांधीग्राम ते नेरधामणापर्यंत (बॅरेज) १0 किलोमीटर जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. गांधीग्राम येथे एका कार्यक्रमाद्वारे जलदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी जलजागृती अभियानामागील पार्श्‍वभूमी सांगून शेतकरी, नागरिकांना जल संवर्धनासाठीचे आवाहन केले. पाणी वापर संस्था प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे यांनी ह्यजल है तो कल हैह्ण या विषयावर शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. भाई प्रदीप देशमुख यांनी याबाबत आपले मत मांडले. या प्रसंगी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यावेळी दिंडीत सहभागी झाले. गोपाला गोपाला जल वाचवा, माती वाचवाचा गजर करीत जलदिंडी नैराट वैराट, राजापूर आदी गावातून धामणा येथे पोहोचली. प्रारंभी येथे शेतकर्‍यांना मातीचा टिळा लावून त्यांचे व जल कलशाचे पूजन करण्यात आले. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात शेतकर्‍यांचे कीर्तनाद्वारे प्रबोधन करण्यात आले. अंधश्रद्धेवर प्रहार करीत भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व कीर्तनातून मांडले.

Web Title: Saplings from the soil of the soil to the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.