शिक्षकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देय सानुग्रह अनुदान लवकरच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:20 IST2021-05-27T04:20:09+5:302021-05-27T04:20:09+5:30
अकोला : दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या व अंशदायी पेन्शन योजना लागू ...

शिक्षकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देय सानुग्रह अनुदान लवकरच मिळणार
अकोला : दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या व अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना द्यावयाचे १० लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि लाभाबाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा व निवेदनाची शिक्षण संचालकांनी दखल घेऊन राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रकरणांची चौकशी करून सर्व अहवाल ग्रामविकास विभागाकडे तातडीने पाठवून शासनाच्या निर्देशानुसार सानुग्रह अनुदान देऊन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार संजय केळकर यांचे सहकार्य मिळाले आहे. जिल्हा कार्यकारिणीकडून प्रकाश चतरकर, वंदना बोर्डे, गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर, सचिन काठोळे, श्याम कुलट, संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, नितीन बंडावार, सुनील माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोष इंगळे, चंद्रशेखर पेठे, राजेश मसने, ग. सु. ठाकरे, समाधान उमप, रामदास वाघ, विजय धनाडे, सुरेश परमाळे, एहसान पठाण, दिनेश भटकर, अजय पाटील, आदींनी पाठपुरावा केला. अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.