वाडेगाव येथे स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:40+5:302021-05-15T04:17:40+5:30
यामध्ये सैनिक असलेले प्रीतम डोंगरे यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविली आहे.या परिसरात नाल्या साफ केल्याने ग्रामस्थांकडून या युवकांचे कौतुक ...

वाडेगाव येथे स्वच्छता अभियान
यामध्ये सैनिक असलेले प्रीतम डोंगरे यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविली आहे.या परिसरात नाल्या साफ केल्याने ग्रामस्थांकडून या युवकांचे कौतुक होत आहे.या भागातील स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला दोष न देता सांडपाण्याची नाली साफ करताना मेजर प्रीतम डोंगरे ,ऋतिक डोंगरे, अक्षय डोंगरे ,नागेश डोंगरे, मंगेश डोंगरे ,गब्बर परमेश्वर, मंगल परमेश्वर, चिंतामण जोरेवार ,अशोक जोरेवार ,आदी युवक मोठ्या संख्येने सहकार्य केले आहे. (फोटो)
---------------------
सस्ती येथे कोरोना समितीमार्फत जनजागृती
दिग्रस बु: येथून जवळच असलेल्या सस्ती येथे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, बसस्थानक, बुद्ध विहार मार्गे समितीने शासनाच्या नियमानुसार रॅली काढून काहींना प्रतिष्ठाने यांना नोटिसा दिल्या, तर विनाकारण फिरणाऱ्यांना समज देण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, मृत्यूंची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाही ग्रामीण भागात नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सस्ती येथे कोरोना समितीमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बाहेर फिरणार नाही, याची ताकीद देण्यात आली. कोणाला विलगीकरण करण्याचे झाले असल्यास येथील शिंदे विद्यालयात ग्रामपंचायत व संस्थांकडून नियोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्रामसचिव संतोष घोडगे, सरपंच द्वारकाबाई मेसरे, उपसरपंच संजय काशीद, ग्रा. पं. सदस्य सुनील बंड, संतोष लासुरकार, नाना अंभोरे, राजकन्या अंभोरे, मीनाक्षी डाबेराव, संजय ताले, शेख इमाम, अनंता परकाडे, डॉ. गाडगे, लोखंडे, आशा सेविका साधना इंगळे, अंगणवाडी सेविका, विश्रांती अंभोरे, अलका सिरसाट, वाडेकर, जि. प. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, सर्व समिती आदी मान्यवर उपस्थित होते. (फोटो)