घरकुलांसाठी रेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:19+5:302021-03-19T04:18:19+5:30

मूर्तिजापूर : जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना व शासनाचे इतर योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुलांची योजना मंजूर आहे. परंतु ...

Sand for houses | घरकुलांसाठी रेती

घरकुलांसाठी रेती

मूर्तिजापूर : जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना व शासनाचे इतर योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुलांची योजना मंजूर आहे. परंतु घरकुलांसाठी लागणारी रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. तसेच काही परिसरामध्ये रेती घाट नाहीत अशावेळी घरकूल उभारणीस अडचण येत असल्याने घरकूल बांधकामासाठी रेती उपलब्ध करुन देण्याची मागणी मायाताई कावरे यांनी १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी गावातील घरकुलांसाठी लागणारी रेती सांगवामेळ वरून आणणे रस्ता खराब व अंतर खूप असल्याने जिकिरीचे आहे, त्यामुळे कोणताही ट्रॅक्टर रेती आणण्यास इच्छुक नसतो.

मूर्तिजापूर तालुक्यातील ज्या गावांमध्ये महसूल विभागामार्फत अनधिकृत रेती जप्त केली आहे ती या घरकुलांसाठी खुली करण्यात यावी तसेच जेथे हा साठा माफक नाही तेथे नदी पात्रातून बैलबंडीव्दारे रेती आणण्यास मान्यता द्यावी.

तरी, आपल्या स्तरावर गटविकास अधिकारी मूर्तिजापूर (व्हेरीफिकेशन) करण्याकरिता, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना आपल्या स्तरावरून रेती उपलब्ध होणेकरिता योग्य त्या सूचना देण्यात याव्यात असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Sand for houses