अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून

By Atul.jaiswal | Published: April 13, 2024 01:34 PM2024-04-13T13:34:41+5:302024-04-13T13:35:17+5:30

रेल्वे प्रशासनाने रविवार, १४ एप्रिल पासून ओडीशा राज्यातील संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

sambalpur pune summer special express will run via akola from sunday | अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून

अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून

अतुल जयस्वाल, अकोला : उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रविवार, १४ एप्रिल पासून ओडीशा राज्यातील संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी १२ अशा एकूण २४ फेऱ्या होणार असून, या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०८३२७ संबळपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी १४ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीत प्रत्येक रविवारी संबळपूर येथून २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०८३२८ पुणे-संबळपूर साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिल ते २ जुलै २०२४ या कालावधीत प्रत्येक मंगळवारी दिनांक पुणे येथून ०९.१५ वाजता सुटेल आणि संबळपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. २-टीयर वातानुकुलीत १, ३-टीयर वातानुकुलीत ४, शयनयान श्रेणी ९, द्वितीय श्रेणी ६ व लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन २ अशी या गाडीची संरचना आहे.

या ठिकाणी राहिल थांबा-

अप व डाऊन मार्गावरील या विशेष एक्स्प्रेसला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंद, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

Web Title: sambalpur pune summer special express will run via akola from sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.