अकोला जिल्ह्याच्या कर्तृत्वाला शासनाचा सलाम
By Admin | Updated: March 19, 2015 01:42 IST2015-03-19T01:42:47+5:302015-03-19T01:42:47+5:30
राज्य शासनाची मोतीराम लहाने कृषी समृद्धी योजना!

अकोला जिल्ह्याच्या कर्तृत्वाला शासनाचा सलाम
अकोला : विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नसून, या शेतकर्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी वर्हाडच्या मातीतील अकोला जिल्हय़ातील भूमिपुत्र स्व. मोतीराम लहाने यांच्या नावाने युती शासनाने कृषी समृद्धी योजना सुरू केली असून, बुधवारी जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५0 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शासनाने जिल्ह्यातील कर्तृत्वाला हा सलाम केला असल्याचे मानले जात आहे.
कर्तृत्ववान, निष्ठावान व विकासाची जाण असलेल्या नेत्याची फळी या जिल्हय़ात होती. त्यामध्ये मोतीराम लहाने यांचे नाव घेतले जाते. बाश्रीटाकळी तालुक्यातील पिंजर या गावात जन्मलेले लहाने यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सामाजिक कारकिर्दीला सुरुवात झाली. जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्ष या राजकीय चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. सन १९९५ मध्ये पहिल्यांदा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी विजयाची पताका फडकविली होती. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी वर्हाडच्या विकासाचे मुद्दे उपस्थित केले. राज्यसभा सदस्य निवडणुकीत तर त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव करू न विजय प्राप्त केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोलाचा हातभार लावला. वर्हाडच्या विकासाला सातत्याने दिशा देण्याचे काम लहाने यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्ष विस्तार करण्याचे काम केले. विकासाची जाण असलेल्या या नेत्यांची दखल शासनाने घेतली असून, त्यांच्या नावाने कृषी समृद्धी योजना लागू केली आहे. यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याने या जिल्हय़ात ही योजना पथदश्री प्रकल्पाच्या स्वरू पात राबविण्यात येईल. त्यानंतर या योजनेचा विस्तार केला जाणार आहे.