रुग्णाला वीज वितरणच्या कार्यालयात सलाईन
By Admin | Updated: June 13, 2014 00:39 IST2014-06-12T22:04:51+5:302014-06-13T00:39:11+5:30
वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाला वीज वितरणच्या कार्यालयात ११ जूनच्या मध्यरात्री सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार अडगाव येथे उघडकीस आला आहे.
रुग्णाला वीज वितरणच्या कार्यालयात सलाईन
अडगाव बु.: वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाला वीज वितरणच्या कार्यालयात ११ जूनच्या मध्यरात्री सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार अडगाव येथे उघडकीस आला आहे.
चितलवाडी येथील महिला रुग्ण शीतल तायडे यांना रात्री १२.३० वाजता डॉ. राजेश दाते यांच्या दवाखान्यात अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले; परंतु अचानक वीज खंडित झाल्यामुळे गावकर्यांच्या मदतीने शीतल तायडे यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात हलवून तेथेच सलाईन लावण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना अडगाव येथील गावक र्यांनी अनुभवला. वीज खंडित झाल्यानंतर पुन्हा वीज पुरवठा पूर्ववत केव्हा होईल, याबाबत उत्तर देण्यासाठी वायरमन गावात हजर नसतात.