बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्डची विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: August 23, 2016 23:48 IST2016-08-23T23:48:58+5:302016-08-23T23:48:58+5:30

खामगावातील प्रकार; किरकोळ व्रिकेता न नेमता, त्यांच्या नावाचा केला वापर.

Sale of SIM cards based on counterfeit documents; The crime against the four | बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्डची विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्डची विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २३ : दुकानाचा बनावट शिक्का, खोटी सही व बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी सुमित जगदीश खेतान (३४) यांनी दिलेल्या तक्रारीत स्थानिक जे. के एजन्सीजकडे रिलायन्स जिओ कंपनीसाठी किरकोळ विक्रेता म्हणून ४ मे २0१६ रोजी त्यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांना कुठलेही नियुक्तीपत्र दिले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. दरम्यान, ७ मे, १0 मे व ११ मे रोजी त्यांच्या मोबाइलवर चार सीमकार्ड अँक्टिवेट केल्याचे एसएमएस आले होते. वास्तविक खेतान यांनी रिलायन्स कंपनीचे कोणतेही सीमकार्ड सुरू करण्याची प्रक्रिया केलेलीच नव्हती.
याबाबत जे.के. एजन्सीजचे आशीष चौधरी, अब्दुल व राजू पांडे यांना भेटून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा शंका प्रबळ झाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीत खेतान यांना रिलायन्स कंपनीचा किरक ोळ विक्रेता दाखवून त्यांच्या नावाचे बनावट रबरी शिक्के तयार करून तसेच खोट्या सह्या करून परस्पर चार सीम कार्डची विक्री केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी आशीष चौधरी, अब्दुल, राजू पांडे व जे.के. एजन्सीचे अधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध कलम ४६५, ४६८, ४७१, ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

सीमकार्डधारक जळगाव व नाशिक जिल्हय़ातील
बनावट दुकानाचा शिक्का, खोट्या सहय़ा व बनावट दस्तावेजाचा वापर करून चार सीमकार्डची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे ही विक्री खामगावातून झाली असताना हे सीमकार्डधारक जळगाव व नाशिक जिल्हय़ातील असल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: Sale of SIM cards based on counterfeit documents; The crime against the four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.