दारूची विक्री; दोघे अटकेत
By Admin | Updated: April 15, 2017 01:19 IST2017-04-15T01:19:37+5:302017-04-15T01:19:37+5:30
अकोला : दुचाकीवरून देशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जैन मंदिराजवळ अटक केली.

दारूची विक्री; दोघे अटकेत
अकोला : दुचाकीवरून देशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जैन मंदिराजवळ अटक केली. त्यांच्याजवळून ३० देशी दारूच्या बाटल्या, ७०० रुपये रोख, असा एकूण ३२ हजार १६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
जैन मंदिराजवळील मटका बाजारात अफजल खान फिरोज खान (रा. लाल बैदपुरा) व अहमद खान शब्बु खान (रा. अकोट फैल) हे मिळून दुचाकी क्र. एमएच-३०-एपी-६३४४ वर बसून देशी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कोतवाली पोलिसांनी छापा टाकून दोघांजवळून दीड हजार रुपयांचे ३१ देशी दारूच्या बाटल्या, विकलेल्या दारूचे ७०० रुपये रोख आणि दुचाकी असा ऐवज जप्त केला.