पश्चिम बंगालचे सैराट प्रेमी युगल पकडले!
By Admin | Updated: June 30, 2016 00:15 IST2016-06-30T00:15:19+5:302016-06-30T00:15:19+5:30
मेहकर तालुक्यात गत चार महिन्यांपासून होते वास्तव्यास.

पश्चिम बंगालचे सैराट प्रेमी युगल पकडले!
मेहकर (जि. बुलडाणा) : पश्चिम बंगालमधील नोदीया जिल्ह्यातील घरून पळालेल्या प्रेमी युगलास पोलिसांनी तालुक्यातील वर्दडी वैराळ येथे बुधवारी पकडले. ही कारवाई मेहकर पोलिस व पश्चिम बंगाल पोलिसाच्या पथकाने केली. पश्चिम बंगालच्या नोदीया जिल्ह्यातील सुजीत तपोवन घोस (२१) या युवकाने त्याच्याच गावातील अल्पवयीन (१६) मुलीला गत चार महिन्यांपूर्वी पळवून आणले होते. या संदर्भात पश्चिम बंगाल मधील संबंधीत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हे प्रेमी युगल मेहकर परिसरात असल्याची पश्चिम बंगाल पोलिसांना माहिती मिळाली. त्यांना मेहकर पोलिसांनी ताब्यात घेऊन पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.