धरणात बुडालेला युवकाचा मृतदेह पिंजरच्या संत गाडगेबाबा बचाव पथकाने काढला शोधून!
By रवी दामोदर | Updated: August 31, 2022 13:45 IST2022-08-31T13:45:27+5:302022-08-31T13:45:51+5:30
युवकाचा मृतदेह बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने दि.३१ ऑगस्ट रोजी शोधून काढला.

धरणात बुडालेला युवकाचा मृतदेह पिंजरच्या संत गाडगेबाबा बचाव पथकाने काढला शोधून!
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या गोप सावंगी येथील उर्द मोर्णा धरणाच्या मागच्या साईडला रस्त्यावर वरील पुलाजवळ भागवत जहागीर काळे (२५) ( रा.गोप सावंगी ता.मालेगाव) हा दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी पाण्यात पडला होता. या युवकाचा मृतदेह बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने दि.३१ ऑगस्ट रोजी शोधून काढला.
युवक बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही. या घटनेची माहिती मालेगाव तहसीलदार काळे यांनी पिंजर येथील मा.से.आ.व्य. फांउडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ सर्च ऑपरेशन करीता पथक पाचारण केले होते. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांचे पथकाचे शाखा मेडशी येथील सहकारी राजेश साठे, नथ्थुभवानी वाले आणी शाखा मंगरूळपीर येथील सहकारी अतुल उमाळे, लखन खोडे, शुभम भोपळे, यांना घटनास्थळी पाठविले. तलाठी घुगे यांच्या सहकार्याने सर्च ऑपरेशन चालु केले होते. बुधवारी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.