सागवान चोरांचा वन कर्मचा-यांवर हल्ला

By Admin | Updated: April 18, 2015 01:56 IST2015-04-18T01:56:39+5:302015-04-18T01:56:39+5:30

मेडशी येथे वन अधिका-यांचा हवेत गोळीबार; चार लाख रुपयांच्या सागवानसह मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत.

Sagaan thieves attacked forest employees | सागवान चोरांचा वन कर्मचा-यांवर हल्ला

सागवान चोरांचा वन कर्मचा-यांवर हल्ला

मेडशी (जि. वाशिम): मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी गस्तीवर असताना सागवानाची चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीवरून शोध घेतला असता चार लाख रुपयांच्या सागवानासह बोलेरो चारचाकी गाडी, हिरो मोटारसयकसह दोन आरोपींना वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी अटक केली तर चार आरोपी फरार झाल्याची घटना १६ एप्रिलच्या रात्री पांगरा बिट कुप नं. १0 या रा खीव वनात ३.३0 वाजता दरम्यान घडली. यावेळी सागवान चोरट्यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांवर दगडाने हल्ला चढविल्याने वन अधिकारी यांनी हवेत गोळीबार केला. सागवान चोरट्यांच्या हल्ल्यात वनपाल मेङ्म्राम किरकोळ जखमी झाले. आरोपीमध्ये चिंचखेडा, ता. पातूर येथील संयुक्त व्यवस्थापन समिती अध्यक्षाचा समावेश आहे. सागवान चोरट्यांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी रा.म. खोपडे यांच्यासह वनविभागाची चमू १६ एप्रिलला रात्रीच्या दरम्यान गस्त करीत होती. रात्री ३ वाजताच्या सुमारास एक चारचाकी वाहन संशयास्पद स्थितीमध्ये पातूरकडून आस्टुल येथील पाण्याच्या टाकीजवळ येताना दिसले. ते वाहन थांबवून वनविभागाच्या चमूने चौकशी केली असता वाहनचालकाने उलट-सुलट उत्तरे दिलीत. वाहनचालकाजवळील भ्रमणध्वनी पाहिला असता त्यावरून एकाच नंबरवरून ३७ वेळा फोन कॉल्स आले. यामुळे वन विभागाच्या कर्मचार्‍यांचा संशय बळावला व त्यांनी फोन कॉलच्या लोकेशनवरून लाकूडतोड्यांचा सुगावा घेतला. पांगरा बिट कुप नं. १0 या राखीव वनात जेथे सागवान चोर होते तेथे पोहचले. वनविभागाचे कर्मचारी तेथे गेल्याबरोबर सागवान चोरांनी वन अधिकारी व कर्मचार्‍यांवर दगडाने हल्ला चढविला. यामध्ये वनपाल मेङ्म्राम यांना दगड लागल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी खोपडे यांनी हवेत गोळीबार केला. यावेळी दोन आरोपींना वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी अटक केली. यामध्ये चिंचखेड तालुका पातूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष उदेभान तुळशीराम लोखंडे (४५) व वाहनचालक इमरान खा मुकद्दर खा (३२) रा. आरीफ नगर, पातूरचा समावेश आहे. तर यावेळी चार आरोपी फरार होण्यात यशस्वी झालेत. या धाडीमध्ये सागवान २९ नग १.११९ घनमीटर माल, चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. ३0 - ए.बी. २६८१, हिरो मोटारसायकल सी.डी. डिलक्स एम.एच. ३0 - ए.बी. ४६७२, हत्यारे जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ तसेच भादंवि ३७९, ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Sagaan thieves attacked forest employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.