शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

सात-बारा बंद; मिळकत पत्रिकेचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 4:48 PM

अकोला: गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सात-बारा देणे महसूल विभागाने बंद केले आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सात-बारा देणे महसूल विभागाने बंद केले आहे. रद्द केलेल्या सात-बारामधील भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत करण्याऐवजी भूखंडधारकांना भूमी अभिलेख विभागात कमालीचा त्रास देण्याचे प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, काही दलालांमार्फत ही कामे विनासायास होत आहे. अकोला शहरातील १२८० सात-बारा बंद झाल्याने त्यातील ६६९ एकरात पडलेल्या भूखंडधारकांना भूमी अभिलेख विभागात चकरा माराव्या लागत आहेत.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार शेत जमिनीसाठी सात-बारा, तर नगर भूमापन किंवा गावठाण क्षेत्रासाठी मिळकत पत्रिका हा अधिकार अभिलेख आहे. तरीही नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील जमीन मालकांची नावे मिळकत पत्रिका व सात-बारा घेण्याची प्रथा सुरूच आहे. त्यामुळे जमिनीच्या हक्कामध्ये गुंतागुंत होऊन फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले. विशेष म्हणजे, हे प्रकार एकच भूखंड किंवा जमिनीची दुहेरी नोंद होत असल्याने घडल्याचे निदर्शनास आले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गावठाण, नगर भूमापन कोणत्याही भूखंड, जमिनीची एकच नोंद पद्धत ठेवण्याचा आदेश जमाबंदी आयुक्तांना द्यावा लागला. यापूर्वीही ही दुहेरी नोंद पद्धत बंद करण्यासाठी डिसेंबर १९९० पासून जुलै २०११ पर्यंत सातत्याने आदेश देण्यात आले. तरीही राज्यातील नगर भूमापन असणाऱ्या क्षेत्रातील सात-बारा अद्यापही बंद झालेला नाही, हा प्रकार तातडीने बंद करून मिळकत पत्रिका नोंदीची प्रक्रिया सुरू करा, असा आदेश राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ३० आॅगस्ट २०१८ रोजी दिला.- सात-बारा बंद करण्याच्या प्रक्रियेला फाटा- नागरी, गावठाण क्षेत्रासाठी नगर भूमापन योजना लागू झाली व मिळकत पत्रिका तयार झाली, त्या ठिकाणी बिनशेती झालेली सर्व सात-बारा बंद करणे.- नगर रचना योजना लागू असल्यास त्या क्षेत्रातील सात-बारा व जुन्या मिळकत पत्रिका बंद करून नगर रचना योजनेत तयार झालेले बी फॉर्मनुसार अंतिम भूखंड क्रमांकानुसार मिळकत पत्रिकेवरील नोंदी कायम करणे अथवा नवीन मिळकत पत्रिका उघडणे. तहसीलदार प्रत्येक गावासाठी आदेश काढून ई-फेरफार आज्ञावलीतूनफेरफार घेऊन सात-बारा बंद करण्याचे निर्देश देतील. मिळकत पत्रिका व सात-बारावरील क्षेत्राच्या नोंदीमध्ये तफावत असल्यास प्रत्यक्ष मोजणी करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत करण्याची प्रक्रिया ठरवून देण्यात आली; मात्र त्या प्रक्रियेला महसूल, भूमी अभिलेख विभागात फाटा दिला जात आहे.- शहरातील बंद झालेले सात-बारागाव               सात-बारा संख्या                 क्षेत्र (हे.आर)अकोली बु.             ३                                      २तपलाबाद               ४                                 १०.६७अक्कलकोट         १७                                  २८.९५सुकापूर               ३३८                                  १५.२अकोला               २२२                                 ६०.३२शहानवाजपूर      १३                                    २४.०१नायगाव             ५९                                     १६.७४उमरी प्रगणे        २२३                                     ४९.७३उमरखेड            ८५                                          ३२.६६मलकापूर          ३१६                                         ३०.६९

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग