शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
2
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
3
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
4
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
5
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
6
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
7
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
8
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
9
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
10
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
11
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
12
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
13
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
14
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
15
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
16
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
17
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
18
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
19
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
20
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

By atul.jaiswal | Updated: February 25, 2022 12:15 IST

Russia-Ukraine war: रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

- अतुल जयस्वाल

अकोला : होणार होणार अशी अटकळ बांधली जात असलेल्या रशिया व युक्रेनदरम्यानच्या प्रत्यक्ष युद्धाला अखेर गुरुवारी तोंड फुटले. दोन देशांदरम्यानच्या या युद्धाला मोठे स्वरूप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आता युद्धाला सुरुवात झाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंता लागून राहिली आहे. दरम्यान, रशियात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांसोबत ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, कानी पडणाऱ्या युद्धाच्या बातम्यांमुळे त्यांच्या पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

विद्यार्थी म्हणतात, आम्ही सुरक्षित

स्मॉलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या अभिषेक मोडक या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यासोबत संपर्क साधला असता, तिकडे तूर्तास सर्व शांत असल्याचे त्याने सांगितले. या युनिव्हर्सिटीमध्ये अकोल्याचे १५ ते २० विद्यार्थी शिकत असून, ते सर्व सुखरूप आहेत. युक्रेनच्या सीमेपासून व युद्धक्षेत्रापासून स्मॉलेंक्स ५०० कि.मी. लांब असल्याने तूर्तास कोणताही धोका नाही. युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाकडूनही सध्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे अभिषेकने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

माझा मुलगा अभिषेक मोडक हा रशियातील स्मॉलेंक्स शहरातील स्मॉलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. त्याच्याशी रोजच मोबाइलवरून संपर्क होतो. तिकडे सर्व शांत असल्याचे तो सांगतो; परंतु हे ठिकाण युक्रेन सीमेपासून ५०० किलोमीटर अंतरावर असल्याने थोडी चिंता लागून राहते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या लाटेतही त्याच्या शिक्षणात अडथळा आला होता. आता युद्धाला तोंड फुटल्याने त्याचा परिणाम शिक्षणावर होऊ नये, असे वाटते.

- सुनील मोडक, पालक, अकोला

माझा मुलगा ओम मोडक हा रशियातील स्मॉलेंक्स शहरातील स्मॉलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे त्याच्याबाबत थोडी चिंता वाटते. बुधवारी सकाळीच त्याच्याशी मोबाइलवरून बोलणे झाले. त्याच्यासोबत अकोला, खामगाव, बुलडाणा येथील इतरही विद्यार्थी आहेत. काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे त्याने सांगितल्याने दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपासून सतत टीव्हीवर युद्धाच्या बातम्यांकडेच लक्ष लागले आहे.

- विनायक मोडक, पालक, गोपालखेड

 

माझी मुलगी तेजस्विनी वजिरे ही रशियातील वोल्गो ग्रँट येथील विद्यापीठात एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला शिकते आहे. सध्या युक्रेन-रशियादरम्यान युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे चिंंता वाटते; परंतु तेथील भारतीय विद्यार्थी सुरक्षित आहेत. मुलीने सुद्धा मला फोन करून काळजी करू नये. आम्ही सुरक्षित आहोत, असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही निवांत आहोत.

 

-भुवन भास्कर वजिरे, पालक, अकोला

टॅग्स :russiaरशियाAkolaअकोलाStudentविद्यार्थीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया