धावत्या मालगाडीला आग; हानी टळली
By Admin | Updated: April 25, 2017 01:37 IST2017-04-25T01:37:22+5:302017-04-25T01:37:22+5:30
बोरगावमंजू: अकोला ते मूर्तिजापूर रेल्वेमार्गावर धावत असलेल्या एका मालगाडीच्या बोगीला सोमवारी सकाळी ८ वाजता आग लागली.

धावत्या मालगाडीला आग; हानी टळली
बोरगावमंजू: अकोला ते मूर्तिजापूर रेल्वेमार्गावर धावत असलेल्या एका मालगाडीच्या बोगीला सोमवारी सकाळी ८ वाजता आग लागली. ही बाब स्टेशनवरील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने गाडी स्टेशनवर थांबवण्यात आली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्यात आली. त्यामुळे, मोठी हानी टळली.
उमरेडवरून नाशिककडे जात असलेल्या मालगाडीच्या बोगी क्र.१४ मधून धूर निघत असल्याचे बोरगावमंजू येथील रेल्वे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.
त्यांनी ताबडतोब ही गाडी बोरगावमंजू स्टेशनवर थांबवली. स्टेशन मास्टर यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दलाने या बोगीला लागलेली आग विझवली. या मालगाडीमध्ये दगडी कोळसा होता. त्यामुळे आणखी पेट घेतला असता तर संपूर्ण गाडीतील कोळसा जळून खाक झाला असता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार काटकर, हेकॉ निसार, अनिल ऐनेवार, सोनकांबळे आदींनी धाव घेउन पाहणी केली.