खडकीतील जुगारावर छापा!
By Admin | Updated: April 1, 2017 03:07 IST2017-04-01T03:07:35+5:302017-04-01T03:07:35+5:30
मटका जुगारावर छापा घालून सहा जणांना अटक;
_ns.jpg)
खडकीतील जुगारावर छापा!
अकोला, दि. ३१- पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने खडकी परिसरातील चिराणी प्लॉटमध्ये सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर छापा घालून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजारांवर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खडकी येथे जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा घालून खडकी येथील अनिल ज्ञानेश्वर ताजने (२१), प्रभाकर महादेव बोरकर (३४), राहुल महादेवराव सम्ररत (२४), संदीप महादेव भगत (२१), सुरेंद्र श्रीकृष्ण काळे (३६ रा. आसरा ता. भातकुली), प्रदीप विश्वनाथ इंदोरे (२३) यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजारांवर मुद्देमाल, वरली मटक्याच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या. विशेष पथकाने दुसरी कारवाई टिळक रोडवरील अलंकार मार्केटमध्ये केली. या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर छापा घालून पोलिसांनी सुरेश लक्ष्मण श्रीनाथ (४0 राम नगर), जाकीर अली अख्तर अली (३८ रा. लक्कडगंज), मोहम्मद समीर मोहम्मद याकुब (२१ रा. भरत नगर), शेख सलीम शेख बुरहान (४२ रा. गवळीपुरा) आणि हरीश ताराचंद नगरिया (५२ रा. गांधी चौक) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा हजारांची रोख व जुगाराच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.