शहरात कचर्याचे ढीग
By Admin | Updated: September 4, 2014 01:31 IST2014-09-04T01:30:55+5:302014-09-04T01:31:18+5:30
अकोला मनपातील अधिकारीच उदासीन; कचरा उचलण्याचा आराखडा कागदावरच

शहरात कचर्याचे ढीग
अकोला : शहराच्या कानाकोपर्यात साचलेली घाण व कचर्याचे ढीग उचलण्यासाठी मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार झोननिहाय ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा आराखडा केवळ कागदोपत्री राबवल्या जात आहे. ठिकठिकाणी साचलेले कचर्याचे ढीग पाहता, महा पालिकेचे संबंधित अधिकारीच उदासीन असल्याचे चित्र आहे.
शहरात घाणीने गच्च भरलेल्या नाल्या-गटारे, व ठिकठिकाणी साचणार्या कचर्याच्या समस्येला अकोलेकर वैतागले आहेत. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नाला सफाईचे काटेकोर पणे नियोजन करण्यात आले. असे असताना आजमितीस मोठय़ा नाल्यांमधील घाण लक्षात घेतल्यास, नाले सफाई कितपत झाली, यावर प्रश्नचिन्ह आहे. शहराच्या विविध भागात दहा-दहा दिवस कचरा उचलला जात नसल्याचे रडगाणे आहे. कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराने कचरा उचलण्यासाठी २0 ट्रॅक्टर लावले असून, नियमित कचरा उचलण्याचा दावा केला जातो. असे असतानासुद्धा शहरा त कचर्याचे ढीग साचल्याची वस्तुस्थिती आहे. या पृष्ठभूमीवर आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी कचरा उचलण्यासाठी नागरिकांच्या दिमतीला झोननिहाय एकूण १९ ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. ही जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी व पर्यवेक्षकांवर सोपवली होती.
शिवाय तातडीच्या कामासाठी सर्व प्रभागांकरिता एक ट्रॅ क्टर नेहमीसाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. अर्थातच, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी तत्पर असणे क्रम प्राप्त असताना, तसे होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आयुक्तांनी अकोलेकरांसाठी तयार केलेल्या स्वच्छता आराखड्याची ऐसीतैशी झाली आहे. (प्र ितनिधी)
*अस्वच्छतेमुळेच आजारांची साथ
प्रभागात ठिकठिकाणी घाण पाण्याची डबके साचली असून, सर्व्हिस लाईन कचर्याने तुंबल्या आहेत. गाजर गवत, काटेरी झुडपे वाढली असून फवारणी होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. परिणामी सवरे पचार रूग्णालयासह शहरातील सर्व लहान-मोठी खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे खच्चून भरली आहेत. अस्वच्छतेमुळे आजारांची साथ असली तरी महापालिका व नगरसेवकांना याचे कोणतेही सोयर सुतक नाही, हे विशेष.