‘आरटीओने’ नऊ महिन्यात केला २४ कोटींचा महसूल जमा

By Admin | Updated: January 21, 2015 01:01 IST2015-01-21T01:01:33+5:302015-01-21T01:01:33+5:30

उद्दिष्टापासून अकोला जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग माघारला.

"RTO" collected revenue of Rs 24 crores in nine months | ‘आरटीओने’ नऊ महिन्यात केला २४ कोटींचा महसूल जमा

‘आरटीओने’ नऊ महिन्यात केला २४ कोटींचा महसूल जमा

अकोला: शासनाच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणारा उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यंदा दिलेल्या उद्दिष्टापासून माघारला असून, विभागाने गत नऊ महिन्यांमध्ये २४ कोटी ७७ लाख ५५ हजार रुपयांचा महसूल गोळा करण्यात यश मिळविले. परंतु उद्दिष्टापेक्षा हा महसूल ७ कोटी रुपयांनी कमी आहे. गत दोन महिन्यांपासून आरटीओ कार्यालयाचे कामकाज धिम्या गतीने सुरू आहे. त्याचाच परिणाम की काय म्हणून आरटीओला यंदा दिलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांचे नोंदणी शुल्क, विलंब शुल्क, शोरूम निरीक्षण शुल्क, वनटाईम टॅक्स, पर्यावरण कर, वाहन क्रमांक शुल्क आणि दंड आदी प्रकारांमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. हा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होतो.
२0१४ व १५ या वित्तीय वर्षामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाला ४२ कोटी ६७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार उपप्रादेशिक परिवहन अकोला विभागाने गत नऊ महिन्यांमध्ये २४ कोटी ७७ लाख ५५ हजार रुपयांचा महसूल गोळा केला. उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या उद्दिष्टानुसार आतापर्यंंत शासनाच्या तिजोरीमध्ये ३१ कोटी ५७ लाख जमा करायचे होते; परंतु यंदा हे उद्दिष्ट गाठण्यामध्ये आरटीओला अपयश आले आहे. अद्याप उद्दिष्टापासून आरटीओ विभाग ६ कोटी ८0 लाख रुपयांनी माघारला आहे. तीन महिन्यांमध्ये ७ कोटी रुपयांचा महसूल गोळा करणे ही बाब अशक्यप्राय आहे.

Web Title: "RTO" collected revenue of Rs 24 crores in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.