शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल भरण्यासाठी आरटीजीएस व एनईएफटी ची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 17:02 IST

महावितरणकडून आॅनलाईनसोबतच आता ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अकोला : घरगुती ग्राहक व को-आॅपरेटीव्ह हाऊसींग सोसायट्यांसह ग्राहकांना १० हजारांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून आॅनलाईनसोबतच आता ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलांची रक्कम भरण्यासाठी आॅनलाईनची सोय असली तरी प्रामुख्याने धनादेशाद्वारे भरण्यात येते. मात्र कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे बँकींग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन महावितरणने १० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच सिंगल किंवा थ्रीफेज घरगुती वीजग्राहकांनाही आता १० हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम या प्रणालीद्वारे भरता येईल. यासोबतच सर्वच प्रकारच्या ग्राहकांसाठी आॅनलाईनद्वारे क्रेडीट कार्ड, नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, गुगल पे, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेट आदींद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा सुरु राहणार आहे.घरगुती ग्राहक व को-आॅपरेटीव्ह हाऊसींग सोसायट्यांसह ग्राहकांना १० हजारांपेक्षा अधिक रकमेचा ह्यआरटीजीएस व एनईएफटीह्णद्वारे भरणा करण्यासाठी त्यांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याची माहिती देण्यात येत आहे. संबंधित ग्राहकांना आरटीजीएस व एनईएफटी चा अर्ज महावितरणने दिलेल्या व्हर्चूल बँक खात्याची माहिती त्यांच्या बँकेत देऊन या सुविधेचा लाभ घेता येईल. तसेच वीजबिलावर असलेल्या बँकेच्या खाते क्रमांकावरच ग्राहकांना वीजबिल भरावे लागणार आहे.

‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंकघरबसल्या वीजबिलांचा आॅनलाईनद्वारे भरणा करण्यासाठी महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांना एसएमएसद्वारे थेट पेमेंट लिंक पाठविण्यात येत आहे. नोंदणीकृत मोबाईलधारक वीजग्राहकांना वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींसह पेमेंट लिंकसुद्धा पाठविण्यात येत आहे. या लिंकद्वारे संबंधीत ग्राहकांना स्वत:चे वीजबिल आॅनलाईनद्वारे थेट भरण्याची सोय आहे. ज्या वीजग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९९३०३९९३०३ क्रमांकावर ‘एमआरईजी’(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस करावा. याशिवाय महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण