RTE: Verification of documents of accessible children! | आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी !
आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी !

ठळक मुद्देशिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे.निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.


- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्या व दुसºया लॉटरी पद्धतीत निवड होऊनही विहित मुदतीत ३७८ बालकांनी प्रवेश घेतले नाहीत. आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ह्यघर ते शाळाह्ण या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची आणि त्यानंतर दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे. विहित मुदतीत पालकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर न केल्याने किंवा शिक्षण विभाग, संबंधित शाळेशी संपर्क न साधल्याने प्रवेशपात्र ९३१ पैकी ३७८ बालकांचे प्रवेश झाले नाहीत. उर्वरीत ५५३ बालकांनी प्रवेश घेतले. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी तिसरी लॉटरी सोडत काढण्यात आली. यावेळी २७० बालकांची निवड झाली. ११ जुलैपासून या बालकांच्या पालकांना ह्यएसएमएसह्ण पाठविले जात आहेत. एसएमएस न आल्यास शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ह्यअ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्सह्णमध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निवडपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, १२ जुलैपर्यंत २७ बालकांचे प्रवेश झाले. १८ जुलैपर्यंत पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून, निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. १८ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.


Web Title: RTE: Verification of documents of accessible children!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.