शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांच्या खंडणीसाठी अकोल्यातील चौघांनी बुलडाणा जिल्ह्यातील इसमास ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 18:26 IST

बाळापूर : बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक (५० ) यांना अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले.

ठळक मुद्देअकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. मोबाईलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर कॉल करून सात लाख रुपयांची खंडणी मागितली. बाळापूर पोलिसांनी ९ जानेवारीच्या रात्रीच काटेपुर्णा येथे जाऊन शे. अकील शे रफीक यांना अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सोडविले.

बाळापूर : बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक (५० ) यांना अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर कॉल करून सात लाख रुपयांची खंडणी मागितली.ती रक्कम न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शे.फैद्दान शे.अकील यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शे.अकील यांची सुटका केली. तसेच कार जप्त करुन एका आरोपीला अटक केली आहे.साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक हे कामासाठी अकोला येथे आले असताना ते साखरखेर्डा येथे परत जात असताना ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता एम. एच.३० ए.एफ. ८१०६ क्रमांकाच्या कारमधून शे. युनूसखाँ जब्बारखाँ सिंधिकँम्प रा .अकोला व इतर तिघे बाळापुरात आले. तेथे त्यांनी शे.अकील यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. त्यांना ९ जानेवारीपर्यत काटेपूर्णा येथील झोपडपट्टीत डांबून ठेवले. त्यानंतर शे.अकील यांच्या मोबाईलवरून शे.फैद्दान शे. अकील यांना कॉल करून आरोपींनी त्यांना सात लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. सदर रक्कम न दिल्यास शे.अकील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या अपहरणकर्त्यांविरोधात शे. फैद्दान शे. अकील यांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये ९ जानेवारी रोजी रीतसर फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी ९ जानेवारीच्या रात्रीच काटेपुर्णा येथे जाऊन शे. अकील शे रफीक यांना अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सोडविले. या प्रकरणी आरोपी शे. युनुसखाँ जब्बारखाँ याला ताब्यात घेतले. तसेच अपहरणासाठी वापरलेली कार जप्त केली. दरम्यान या अपहरण व खंडणी प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपी युनूसखॉ जब्बारखाँ व अन्य अनोळखी तीन आरोपींविरुद्ध भा.दं.वि.च्या ३६४(अ), ३६३,३८६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे.काँ. शुद्धोधन इंगळे , हे. काँ. जोशी करीत आहेत .(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akola cityअकोला शहरBalapurबाळापूरPoliceपोलिसCrimeगुन्हा