जुने शहरातील दाेन जुगार अड्ड्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:11+5:302020-12-29T04:18:11+5:30

अकाेला : जुने शहरातील साेनटक्के प्लाॅट तसेच जयरामसिंग प्लाॅट येथे माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलीस अधीक्षक जी. ...

Rows on gambling dens in the old city | जुने शहरातील दाेन जुगार अड्ड्यांवर धाडी

जुने शहरातील दाेन जुगार अड्ड्यांवर धाडी

अकाेला : जुने शहरातील साेनटक्के प्लाॅट तसेच जयरामसिंग प्लाॅट येथे माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने रविवारी धाडी टाकून आठ जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून राेखरकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने सोनटक्के प्लॉट येथील जुगारावर धाड टाकून नरेंद्र साहेबराव महल्ले (वय ५४, रा लोकमान्यनगर), शेख असिफ शेख युसूफ (वय ४४, रा. सोनटक्के प्लॉट), शेख सलीम शेख गुलाब (वय ४७, रा. सोनटक्के प्लॉट), शेख शकील शेख हकीम (वय ३८, रा. सोनटक्के प्लॉट) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर विशेष पथकाने जयरामसिंग प्लॉट येथे सुरू असलेल्या जुगाराव धाड टाकून राजकुमार रामदास यादव (वय ३६, जयरामसिंग प्लॉट), अरुण भीमराव इंगोले (वय ६०, शिवसेना वसाहत), प्रकाश पांडुरंग बेतवर (वय ४६, रा. दसेरानगर), अमोल अजाबराव उन्हाळे (वय ३६, रा जुने शहर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगार साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Rows on gambling dens in the old city