अकोला जिल्हय़ातून भुमिका खंडेलवाल अव्वल
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:18+5:30
जान्हवी बोर्डे, पूजा ठाकरे, साक्षी पाटील, भक्ती सोनी द्वितीयस्थानी.

अकोला जिल्हय़ातून भुमिका खंडेलवाल अव्वल
अकोला: शालांत माध्यमिक परीक्षा(इयत्ता १0 वी) चा निकाल सोमवारी जाहिर झाला. निकालादरम्यान अकोला जिल्हय़ात सर्वत्र मुलींचा दबदबा दिसून आला. जिल्हय़ातून कोठारी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी भुमिका राजेश खंडेलवाल हिने ९८.६0 टक्के गुण मिळवित अव्वल स्थान पटकावले. यासोबतच, बालशिवाजी माध्यमिक शाळेची जान्हवी अविनाश बोर्डे हिने ९८.४0 टक्के, होलीक्रॉस शाळेची साक्षी पाटील हिने ९८.४0 टक्के, भारत विद्यालयाची भक्ती संतोष सोनी हिने ९८.४0 टक्के गुण प्राप्त करीत जिल्हय़ातून दुसरे स्थान प्राप्त केले.
बालशिवाजी माध्यमिक शाळेचा समीर अनिल पिंपरखेडे याला ९८.२0 टक्के, मल्हार मनीष देशपांडे याला ९८.२0 टक्के, माऊंट कारमेल शाळेचा आदित्य खोंड याने ९८.२0 टक्के गुण पटकावून जिल्हय़ातून तृतीय स्थान मिळविले. यासोबतच भारत विद्यालयाची अपूर्वा विजय सोळंके हिने ९७.८0 टक्के, खंडेलवाल इंग्लिश शाळेची सृष्टी दलाल हिने ९७.६0 टक्के, वैष्णवी वडे हिने ९७.४0 टक्के, बालशिवाजी माध्यमिक शाळेची जान्हवी गजानन जळमकर हिने ९७.४0 टक्के, दर्शन चौधरी याने ९७.२0 टक्के, बालशिवाजीचा बिंदव पंकज जोशी याने ९७.00, विवेकानंद इंग्लिश स्कूलचा कृष्णा गोविंद जोशी याने ९७ टक्के, खंडेलवाल इंग्लिश स्कूलची आकांक्षा पातोडकर हिने ९७ टक्के, कांदबरी खापरे हिने ९७.८0 टक्के यांनीही घवघवीत यश संपादन केले.
जिल्हय़ात मुलीच सरस
दहावीच्या निकालामध्ये जिल्हय़ात मुलींनी बाजी मारली असून, मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. शहरातील सर्वच शाळांमधून मुलींनी अव्वल स्थान मिळविले. जिल्हय़ात चार मुलींनी ९८ टक्क्यांच्यावर गुण मिळविले असून, केवळ दोन मुलांनीच ९८ टक्क्यांच्यावर गुण मिळविले. जिल्हय़ातील एकंदरीत निकालावरून मुलींनी वर्चस्व कायम ठेवले आहे.