रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यमुक्त; प्रभार शिंदे यांच्याकडे!
By Admin | Updated: July 9, 2017 09:25 IST2017-07-09T09:25:04+5:302017-07-09T09:25:04+5:30
रोहयो उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यमुक्त; प्रभार शिंदे यांच्याकडे!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महिनाभरापूर्वी बदली करण्यात आल्याने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे शुक्रवारी कार्यमुक्त झाले. त्यामुळे रोहयो उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. शासनाच्या गत ३0 मे रोजीच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे यांची बुलडाणा येथे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) म्हणून बदली करण्यात आली. त्यानुसार ७ जूलै रोजी ते अकोल्यातून कार्यमुक्त झाले.