मजुरीसाठी रोहयो मजुरांच्या बँकेच्या फे-या वाचणार!

By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30

‘बीसी’ प्रणालीद्वारे गावात, कामाच्या ठिकाणी मिळणार मजुरी.

Rohuya laborer's bank reads for wages! | मजुरीसाठी रोहयो मजुरांच्या बँकेच्या फे-या वाचणार!

मजुरीसाठी रोहयो मजुरांच्या बँकेच्या फे-या वाचणार!

संतोष येलकर/ अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात बँक खात्याशी संलग्नित मजुरांना त्यांच्या मजुरीची रक्कम १५ जुलैपासून बँकांच्या व्यावसायिक प्रतिनिधींमार्फत (बीसी) प्रदान केली जाणार आहे. या प्रणालीद्वारे रोहयो मजुरांच्या गावात आणि कामाच्या ठिकाणीच मजुरीची रक्कम मिळणार असल्याने, मजुरीसाठी रोहयो मजुरांना बँकांकडे माराव्या लागणार्‍या चकरा आता कमी होणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बिजनेस करस्पाँडंटह्ण (बीसी) प्रणालीचा वापर करून मजुरांना मजुरीचे वितरण करण्याबाबत केंद्र शासनामार्फत राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व बँकांकडून ह्यबिजनेस करस्पाँडंटह्णच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बँकांच्या या व्यावसायिक प्रतिनिधींच्या याद्या प्रत्येक जिल्हय़ात उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्यामार्फत जिल्हा अग्रणी बँक व इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या जिल्हा व्यवस्थापकांकडून प्राप्त केल्या जात आहेत. रोहयो अंतर्गत आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित (लिंक) असलेल्या राज्यातील रोहयो मजुरांना १५ जुलैपासून प्रणालीद्वारे मजुरीचे वितरण करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे रोहयो मजुरांना संबंधित गावात किंवा कामाच्या ठिकाणी मजुरीचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कामाच्या मजुरीसाठी मजुरांना वारंवार बँकांकडे माराव्या लागणार्‍या फेर्‍या कमी होणार आहेत. 

Web Title: Rohuya laborer's bank reads for wages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.